मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एवढेच नाही तर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडले. आपल्याच लोकांनी दगा दिला, असे सांगत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. शिवसेनेतले एकून ३९ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. याचा मोठा फायदा भाजपला झाला. गेले ९ दिवस चाललेल्या या नाट्यात शिवसेनेला रोज नवीन धक्के बसले.
अडीच वर्षापूर्वी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे तीन पक्ष सामील होते. या तीन्ही पक्षांना एकत्र आणण्यास खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. दरम्यान शिवसेनेतच फूट पडल्याने महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सर्व क्षेत्रातून त्यांच्याबद्दल भावनिक पोस्ट सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. लोकांच्या मनावर राज्य करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अभिमान असल्याच त्यांनी या ट्विट मध्ये म्हंटल आहे.
सत्ता येते ,जाते पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुसंस्कृत,संवेदनशील, लोकांच्या मनावर राज्य करणारे मुख्यमंत्री मा.उद्धव साहेब ठाकरे यांचा अभिमान आहे.#महाविकासआघाडी
— Rupali patil thombare (@Rupalispeak) June 30, 2022
महाराष्ट्रातील परिस्थिती मागे कोण आहेत आणि सत्ता मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करीत आहे हे स्पष्ट झाले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या जगण्यासाठी आणि विकासासाठी खूप योगदान दिले आहे. आताच्या परिस्थितीत त्यांच्या दोन्ही मुलांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हंटल होत. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एक भावनिक ट्विट केल आहे. “सत्ता येते ,जाते पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुसंस्कृत, संवेदनशील, लोकांच्या मनावर राज्य करणारे मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरे यांचा अभिमान आहे.” अशा आशयाचं ट्विट रूपाली ठोंबरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

