मुंबई : गेले आठ ते दहा दिवस राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरु होत्या. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं होत. शिवसेनेचे जवळपास ३९ आमदार बंड पुकारत शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे ठाकरे सरकारने अखेर बहुमत गमावलं आहे. यानंतर काल रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होत. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालनाकडे सुपूर्द केला. या सर्व घडामोडीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आता एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी कायम आहे आणि पुढे राहील का ? या पत्रकाराच्या प्रश्ना ला उत्तर दिले आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले महाविकास आघाडी कायम आहे की नाही ते ठरवू. आमची चर्चा सुरू आहे. त्यानंतर महावीकास आघाडी बद्दल ठरवू, असं ते म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडी देखील संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच यानंतर आता महाविकास आघाडीचं पुढे काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, काल अखेर महाविकास आघाडी सरकारची अखेरची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. तसेच काल फेसबुक लाईव्ह मध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, आज मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. आशीर्वाद दिले. मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल, त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. असं देखील ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

