🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएमने आघाडीची ऑफर दिली आहे. या कारणाने एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? ही चर्चा सुरु असताना पाहायला मिळत आहे.
मागच्या अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांच्या सरकारवर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात असताना सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली आहे. एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली ऑफर एक खासदार, २९ नगरसेवक, दोन आमदार सध्या चर्चेत आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात मीडियाशी बोलताना माहिती दिली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाच इम्तियाज जलील यांनी एमआयएमकडून आव्हान दिले आहे. म्हणाले, “आमच्यावर आरोप करण्यात येतात की भाजपा आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे”, तसेच आता राष्ट्रवादीनं त्यांची भूमिका सिद्ध करून दाखवावं असं इम्तियाज जलील यांनी थेट आवाहन दिले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
