मुंबई : संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएम बद्दलची चर्चा धूडकाळून लावली आहे. संजय राऊत म्हणाले, “औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते? तुम्ही विचारच कसा करू शकता? असा विचार करणंच एक आजार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
शिवसेनेने एमआयएमसोबतच्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तसेच संजय राऊत म्हणाले, “शिवसेना हा शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श असतो. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊच शकत नाहीत. ते शिवसेनेचे आदर्श होऊच शकत नाहीत. त्यामुळे एमआयएम आघाडीत येणार या अफवा आहेत. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे. हे तुम्ही बंगाल आणि उत्तर प्रदेशातही पाहिलं आहे. जे आधीच भाजपसोबत छुप्या युतीत काम करत आहेत. त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाच संबंध येत नाही”, असे मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

