मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. त्यामुळे महाराष्ट्रातही मविआ सरकार अस्थिर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकून स्फोट केला. तद्पश्चात आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा परिहवन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘२६ मार्च – चला दापोली अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया’, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
26 March Chalo Dapoli
Demolish Anil Parab's Resort
२६ मार्च – चला दापोली
अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया @BJP4India@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/p2UIxCneem
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 19, 2022
दरम्यान, किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी अनिल परब यांचे रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते की, ‘मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसांत होणार आहे’, असे किरीट सोमय्या म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर इम्तियाज जलील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले,“अशा लोकांना आपण…”
- “शिवसेना आणि एमआयएम कसे एकत्रं येतात ते पाहू” – देवेंद्र फडणवीस
- अखेर ग्लेन मॅक्सवेल झाला भारताचा जावई; विनी रमनसोबत बांधली लग्नगाठ!
- “एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही”, संजय राऊतांनी केले स्पष्ट
- कपिल देवसोबत दिग्गजांच्या यादीत बेन स्टोक्सचा समावेश ; नवीन विक्रमाची नोंद


