Share

“किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला ‘या’ कंपनीकडून लाखोंच्या देणग्या”; संजय राऊतांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत दिवसेंदिवस नवीन आरोप करताना पाहायला मिळत आहेत. किरीट सोमय्या विरुद्ध राऊत या वादात आज संजय राऊतांनी पुन्हा एकदा सोमय्यांविरोधात नवा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात ट्विट्सची मालिका सुरू केली आहे. यात आज संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर सलग तिसऱ्यांदा आरोप केला आहे.

संजय राऊत मागील तीन दिवसांपासून किरीट सोमय्यांविरोधात ट्विटरवर आरोपांवर आरोप करत आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी मुख्यत्वे किरीट सोमय्यांशी निगडीत युवक प्रतिष्ठानला येणाऱ्या निधीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखोंच्या देणग्या मिळाल्या, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

 

“किरीट सोमय्या यांनी NSEL ची ५६०० कोटी शेअर्सच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे चौकशीची मागणी केली. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ED ने चौकशी केली. स्वत: किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले होते. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्याच्या युवाक प्रतिष्ठानसाठी घेतले”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!