Share

IPL 2022 : ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण ठरणार बादशाह? वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दरवर्षी आयपीएल (IPL) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागलेले असते. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. तर सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केले जाते. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात. आता स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आता ऑरेंज आणि पर्पल कॅप कोण जिंकणार याकडे लागले आहे.

युझवेंद्र चहल अग्रस्थानी

आयपीएलच्या या हंगामामध्ये पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स (RR)चा युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक २२ गडी बाद केले आहेत. दुसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) वानिंदू हसरंगा आहे. त्याने २१ गडी बाद केले आहेत. तिसऱ्या स्थानी पंजाब किंग्ज (PBKS)चा कागिसो रबाडा आहे. त्याने १८ गडी बाद केले आहेत. चौथ्या स्थानी दिल्ली कॅपिटल (DC)चा कुलदीप यादव आहे. त्याने देखील आयपीएलच्या या हंगामामध्ये १८ गडी बाद केले आहेत. पाचव्या स्थानी सनरायजर्स हैदराबाद (SRH)चा टी नटराजन आहे. त्याने १७ गडी बाद केले आहेत.

जोस बटलरच वर्चस्व कायम

आयपीएल (IPL)च्या पंधराव्या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्स (RR)चा जोस बटलर ऑरेंज कॅपच्या तक्त्यामध्ये पहिल्या स्थानी कायम आहे. त्याने या हंगामामध्ये आतापर्यंत ६१८ धावा काढल्या आहेत. दुसऱ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स (LSG)चा केएल राहुल आहे. राहुलने आयपीएलच्या या हंगामामध्ये ४५९ धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चा फाफ डु प्लेसिस असून त्याने ३८९ धावा काढल्या आहेत. चौथ्या स्थानी शिखर धवन धवनला धक्का देत गुजरात टायटन्स (GT)चा शुभमन गिल आलाय. याने आतापर्यंत ३८४ धावा काढल्या आहेत. तर पंजाब किंग्ज (PBKS)च्या शिखरने ३८१ धावा आयपीएलच्या या हंगामामध्ये काढल्या असून तो पाचव्या स्थानी गेलाय.

गुजरात विरुद्ध लखनऊ सामना 

आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामात मंगळवारी गुजरात (GT) विरुद्ध लखनऊ (LSG) यांच्यात सामना खेळला गेला. गुजरातने हा सामना ६२ धावांनी जिंकत लखनऊ संघाचा धुवा उडवला. या सामन्यात गुजरातने लखनऊला विजयासाठी १४५ धावांचे लक्ष्य दिले होते. गुजरातच्या शुबमन गिलने एकेरी झुंज देत नाबाद ६३ धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात केएल राहुलच्या (KL Rahul) लखनऊ संघाचा डाव ८२ धावात आटोपला. गोलंदाजी करताना गुजरातकडून राशिद खानने आपल्या नावाला साजेसा खेळ दाखवला. त्याच्या लेग ब्रेक गोलंदाजीसमोर लखनऊचे फलंदाज झुंजाताना दिसले. त्याने चार षटकांमध्ये २४ धावा देत चार बळी घेतले. राशिद खानने अष्टपैलू दीपक हुड्डाला (२७), कृणाल पंड्या (५), जेसन होल्डर (१) आणि आवशे खान (१२) यांना बाद केले. या सामन्यात राशिद खानने त्याच्या अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. या विजयासह गुजरात संघ गुणतालिकेत १८ गुणांसह अव्वलस्थानी असून प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर लखनऊ १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्यास्थानी आहे. लखनऊने हा सामना गमावल्यामुळे त्यांची प्लेऑफमध्ये जाण्यासाठीची कसरत वाढली आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!