Share

“अयोध्या आमची पायवाट आहे, तारीख लवकरच जाहीर…” – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या हिंदुत्व आणि अयोध्या दौऱ्याचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्या यात्रेची घोषणा केली आहे. या पाश्वर्भूमीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यात एक बैठकही पार पडली. यानंतर अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे, असा टोला संजय राऊत यांनी मनसेला लगावला.

अयोध्या दौऱ्या निमित्त मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक खास रेल्वेचं बुकिंग करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील अयोध्या दौरा करणार आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांचा दौरा होऊ शकतो असा अंदाज आहे. अशातच संजय राऊत यांनी अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ती आमची पायवाट आहे, असा टोला लगावला आहे.

“गेली 30 वर्षे शिवसेना आणि अयोध्या हे नातं आहे. त्यामुळे आम्हाला तयारी करण्याची गरज नाही. आम्ही अयोध्येत जात असतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि नंतरही स्वत: आदित्य ठाकरेही जाऊन आले. मधल्या काळात कोरोनामुळे आम्हाला जाता आलं नाही. आमचा अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय. चार पाच दिवसांत तारीख ठरवू, असं राऊतांनी जाहीर केलंय. तसेच शरयूच्या तिरावर एखादा कार्यक्रम करायचा तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आमचे कार्यकर्ते तिकडे गेले आहेत. कोण काय म्हणतं यावर आमचे दौरे ठरत नाहीत”. असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!