🕒 1 min read
मुंबई: आज १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. तर येत्या ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकासाठी शिवसेना कुणाला पाठींबा देणार , याबात चर्चा रंगत आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मार्गारेट आल्वा यांच्या नावावर सर्वांचे एकमत असून त्या अनुभवी नेत्या आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहू”, असे संजय राऊत म्हणाले आहेत. असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
दरम्यान काल दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आल्वा केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या, गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी कारभार केला आहे. या बैठकीला शिवसेनेचे खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. यावरूनच भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे.
सेनेचा NDA ला पाठींबा असताना राऊत विरोधकांसोबत का?
“उद्धव ठाकरे यांनी आधीच एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही का? मग विरोधी पक्षाच्या बैठकीत संजय राऊत काय करत आहेत? उद्धवजी कधीही न येण्यापेक्षा उशीर बरा?”, असे ट्वीट करत एकप्रकारे नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा युतीसाठी आमंत्रण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari : मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभात महापुरुषांचा अपमान; अमोल मिटकरी आक्रमक!
- Shinde VS Thackeray : शिवसेना-शिंदे गट संघर्ष; ‘त्या’ याचिकेवर बुधवारी होणार सुनावणी
- Nitesh Rane : सेनेचा NDA ला पाठींबा असताना राऊत विरोधकांसोबत का? ; राणे बंधूंनी ‘निष्ठावंत’ म्हणत डिवचले
- Sanjay Raut : ‘प्रेमरोगा’ने वासू-सपनाच्या राजकीय संसाराचे काय होणार?; शिवसेनेची शिंदे-फडणवीसांवर टीका
- IND vs ENG : ऋषभ पंतचा शतकी तडाखा अन् हार्दिक पंड्याची अष्टपैलू खेळी; भारताचा ५ गडी राखून विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
