Share

‘मिका सिंह’ला हवी आहे कपिल शर्माच्या पत्नीसारखी जीवनसाथी,म्हणाला

Published On: 

मुंबई : मिका सिंह ने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मिका सिंह कोणत्याही खाजगी डेस्टिनेशनवर लग्न करत नसून ‘स्वयंवर –मिका दी वोहती’ या नवीन शोमध्ये तो आपला जीवनसाथी शोधण्यासाठी बाहेर पडला आहे. खरं तर त्याच्या शेजारी राहात असलेल्या कपिल शर्माचे सुखी वैवाहिक जीवन पाहून आता मिका सिंगलाही ‘गिन्नी वहिनीसारखी समजूतदार मुलगी आपल्या आयुष्यात आणायची आहे.

माध्यमांशी बोलताना मिका म्हणाला की, “कपिल खूप छान माणूस आहे. आपण सर्व लोक भूमीवरून आलेलो आहोत आणि इथपर्यंत पोहोचलो आहोत. कपिलच्या पत्नीसारखी जीवनसाथी मला भेटायला पाहिजे असे तो म्हणाला, कपिलची आईही माझ्यावर खूप प्रेम करते आणि मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे..” असे सांगते. तिचा मुलगा स्टार आहे की, नाही याच्याशी तिला काही देणेघेणे नाही, ती अजूनही तशीच आहे. त्याच्या नजरेत मी फक्त त्याच्या मुलाचा मित्र आहे.

मिका पुढे म्हणाला, “कपिल पाजी खूप भाग्यवान आहात. मला आशा आहे की, गिन्नी वहिनी सारखी शहाणी मुलगी भेटलीय.अशी मुलगी माझ्या आयुष्यात आली तर माझंही आयुष्य सुरळीत होईल” मिका आणि कपिल शर्मा मुंबईत वर-खाली मजल्यांवर एकाच इमारतीत राहतात. लॉकडाऊन दरम्यान कपिल मिकाच्या घराच्या बाल्कनीत संगीत वाजवतानाही खूपदा दिसला आहे.

महत्वाच्या बातम्या :

“एसटी संपावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरलं” – अनिल परब

“जगभरात कोरोनाची चौथी लाट…”, राजेश टोपेंचे सूचक वक्तव्य

पुष्कर जोगच्या ‘अदृश्य’ चित्रपटाचं पोस्टर झालं रिलीज!

राणे पिता-पुत्रांच्या आरोपांनंतर दिशा सालियन कुटुंबियाचे थेट राष्ट्रपतींना पत्र

शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची देवयानी फरांदे यांची मागणी!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!