मुंबई : दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून चीनमध्ये अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
यासंदर्भात बोलत असतांना राजेश टोपे म्हणाले की,‘जगभरात कोरोनाची चौथी लाट दिसत असून त्यातून शिकवण घेण्याची गरज आहे. लोकांनी सतर्क राहायला हवे. तसेच निष्काळजीपणे वागणे चुकीचे आहे.’ आपण वेट अँड वॉचची भूमिका घेतली पाहिजे, कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे पालन करावे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोरोनाच्या शिरकावानंतर लागू करण्यात आलेले सर्व प्रतिबंधात्मक निर्बंध ३१ मार्चपासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला असून असे असले तरी मास्क, सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “लाखो घरे उध्वस्त होत असताना मुख्यमंत्र्यांना…”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
- शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची देवयानी फरांदे यांची मागणी!
- “पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा”, रोहित पवारांची मागणी
- Women’s World Cup : अनस्टॉपेबल ऑस्ट्रेलिया..! स्पर्धेत नोंदवला सलग सातवा विजय
- “…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा


