🕒 1 min read
मुंबई: दिशा सालियन बदनामी प्रकरणी (Disha Salian defamation case) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. “दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली याचा पुरावा आहे.लवकरच कोर्टाच्या माध्यमातून CBI कडे पेनड्राईव्ह देणार”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. ते काल (२४ मार्च) विधानभवनात बोलत होते. मात्र आता राणे पिता-पुत्रांच्या आरोपांनंतर दिशा सालियन कुटुंबियांनी थेट राष्टपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवले आहे.
दिशा सालियनच्या पालकांनी राष्टपती रामनाथ कोविंद यांना पाठवलेले हे पत्र ५ पानी असून या पत्रात त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. ते आमच्या मुलीची प्रतिमा खराब करत आहेत. त्यामुळे तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊन आम्हाला योग्य तो न्याय द्या, अन्यथा आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग, असे ही त्यांनी या पत्राद्वारे म्हटले आहे. तसेच हा अर्ज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनाही पाठवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होऊन दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी केली जात होती. त्यात दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यातच नारायण राणे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती.
महत्वाच्या बातम्या:
शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची देवयानी फरांदे यांची मागणी!
“आमदारांना खिरापती वाटल्यासारखं घर वाटणे म्हणजे…”, राम सातपुतेंचा ठाकरे सरकारवर निशाणा
शरद पवारांच्या नातवाचा ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सोबत फोटो होतोय व्हायरल
“लाखो घरे उध्वस्त होत असताना मुख्यमंत्र्यांना…”, चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र
ठाकरे परिवाराने ‘कोमो स्टॉक’मार्फत सात कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
