मुंबई – विधानसभा अधिवेशनात आज आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महानगरपालिका जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे होणारे लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.
यापुढे कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, या वर्षभरात जास्तीत जास्त शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
तसेच द्वारका येथील अवैध वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. द्वारका येथे पोलिस व अवैध वाहतूक करणारे यांच्यात संगनमत असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. या प्रकरणावरती तोडगा काढण्यासाठी मंत्री महोदय यांनी आपल्या दालनात बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत केली. पुढे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी अवैध वाहतुकीवर कारवाई केली जाईल. व लवकर दालनात बैठकीचे आयोजन केले जाईल असे आश्वासन विधानसभेत दिले.
महत्वाच्या बातम्या –
“किरीट सोमय्यांना थांबवायची हिम्मत तर करून पाहा” – निलेश राणेंचं आव्हान
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेचा भीमपराक्रम; मोडला स्वत:चाच ऑलिम्पिक रेकॉर्ड!
शिवसेना नेते प्रताप सरनाईकांना ईडीचा दणका; ११.३५ कोटींची संपत्ती जप्त
“मेव्हणा अडकल्यावर लगेच ते ॲक्टिंव्ह झाले अन…” – निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
आमदारांच्या मोफत घरांसंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी केला खुलासा; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

