मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी मुंबईमधील ब्रीच कॅन्डी या रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी न्यूमोनिया आजाराशी लढताना निधन झाले. लता मंगशकर यांच्या आवाजाचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते होते. लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाल्यावर अनेक पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यात पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान, पाकिस्तानचा विद्यमान कर्णधार बाबर आझम, पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीझ राजा आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस यांनी ट्विटर वरून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने पण लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि एक आठवण तसेच खंत पण बोलून दाखवली आहे. शोएब अख्तरच्या म्हणण्यानुसार माझ्यात आणि लता मंगेशकर यांच्यात आई आणि मुलाचे नाते होते, त्यांनी माझ्याकडे एक इच्छा पण व्यक्त केली होती परंतु ती आता अपूर्ण राहणार असल्याची खंत शोएब अख्तरने बोलून दाखवली आहे आणि लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत अधिक बोलताना शोएब अख्तर म्हणाला कि,” मी काही कामानिमित्त २०१६ साली मुंबई शहरात आलो होतो, तेव्हा मी मुंबई शहरात पोहचल्यावर लता मंगेशकर यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यांना तेव्हा भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी माझ्या गोलंदाजीचे कौतुक करत मी तुझे आणि सचिन तेंडुलकरचे अनेक सामने बघिलते आहेत. तू मैदानावर आक्रमक असलास तरी तू मनाने स्वछ आहेस हे मला ठाऊक आहे, त्यामुळे तुझा मूळ स्वभाव असाच ठेव आणि सध्या शक्य नसल्यामुळे मला भेटायला नंतर नक्की ये. परंतु त्यानंतर शोएब अख्तर आणि लता मंगेशकर यांच्यात कधीच बोलणे पण झाले नाही आणि प्रत्यक्षात त्यांची कधीच भेट पण होऊ शकली नाही. याची शोएब अख्तरला खूप खंत आहे.
त्याने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानच्या गायिका नूर जहान यांच्या बरोबरचा लता मंगेशकर यांचा एक फोटो पण शेअर केला आहे.
On my last visit to India in 2016, i had the pleasure of speaking to her on the phone. She paid heartfelt tributes to Mehdi Hasan sb & Madam Noor Jehan.
There won't be another. #LataMangeshkar .
I've told the conversation details in the video below: https://t.co/70L6UzpJtV pic.twitter.com/k8ZC3oZwZM— Shoaib Akhtar (@shoaib100mph) February 6, 2022
महत्वाच्या बातम्या :
- ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमीनी लाटण्याचं काम केलं’; चंद्रकांत पाटलांचा आरोप
- मुंडे बंधू – भगिनीमधील वाद पुन्हा शिगेला, धनंजय मुंडे म्हणाले कि…
- लता मंगेशकर सावरकरांना मानणाऱ्या होत्या म्हणून त्यांचा अपमान होतो आहे का ?
- गोव्याच्या स्वातंत्र्यावरून मोदींचा पुन्हा नेहरूंवर निशाणा
- गोव्याच्या राजकारणाबद्दल काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

