Share

लता मंगेशकर सावरकरांना मानणाऱ्या होत्या म्हणून त्यांचा अपमान होतो आहे का ?

Published On: 

सांगली: रविवारी (०६ फेब्रुवारी) रोजी गाणकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्य संस्कार पार पडले. यावेळी दिल्लीपासून अनेक दिग्गज व्यक्तींनी त्यांना निरोप देण्यासाठी मुंबईत उपासतिथी दाखविली.  त्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या निधनानंतर २ दिवसांचा दुखवटा जाहिर केला होता. तसेच सोमवारी (०७ फेब्रुवारी) रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. अनेक राजकीय कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले.

मात्र त्यांचा राजकीय दुखवटा सुरू असतानाच काल सोमवारी (०७ फेब्रुवारी) रोजी सांगलीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाद्याक्ष जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाविरुद्ध भाजप कडून टीका केली जात आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी राज्याचे मंत्रीच मुख्यमंत्र्यांचे आदेश मानत नाहीत का ? असा सवाल उपस्थित केला. तसेच लता मंगेशकर हिंदुत्ववादी आणि सावरकरवादी होत्या म्हणून अश्या प्रकारे अपमान केला जातो आहे का ? हा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे. राज्यात दुखवटा असून सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले गेले आहेत. तसेच सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली असून, अश्या कार्यक्रमात जबाबदार मंत्र्यांनी जाणे योग्य आहे का ? असा प्रश्न कंबोज यांनी केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!