बीड : महाराष्ट्रातील राजकारणात सग्या सोयऱ्यांमधील वाद सगळ्यांनाच ठाऊक आहेत. ठाकरे बंधू असतो कि मुंडे बंधू- भगिन. ठाकरे बंधूंमध्ये जसे विळ्या भोपळ्याचे नाते आहे, तसेच काहीसे नाते मुंडे बंधू भगिनी मध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष हे या मुंडेना पाठबळ देत असतात. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करून निर्माण झालेल्या खड्ड्यात चार मुलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान यावरुन पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आमने-सामने आले आहेत. शाळकरी मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर याला उत्तर देत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.
चार मुलांच्या मृत्यूबद्दल मी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना याबाबत विचारणा केली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तिथे खड्डा झाला, पाणी साचलं आणि खेळायला गेले असता मुलांचा मृत्यू झाला हे खरं आहे. तो वाळूचा खड्ड अधिकृत होता की अनधिकृत होता? अधिकृत होता तर इतक्या खोलपर्यंत करता येतो का? अनधिकृत होता तर कारवाई का झाली नाही? याची माहिती घेतली जात आहे,” अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
दोषी असल्यास तहसीलदारांपासून पोलिसांपर्यंत सर्वांवर कारवाई केली जाणार आहे सांगताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या मागणीवर उत्तर दिलं की, तुमच्या काळात वाळू माफियांवर ३०२ चा गुन्हा दाखल झाला असेल तर निश्चित करू, मात्र आता तो होत नाही. तसंच ३०२ खड्ड्यावर करायचा का? चौकशीअंती अनेक गोष्टी समोर येतील आणि त्यानंतर कारवाई करता येईल असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- आसाम मधील एका पत्रकाराला, प्रश्न विचारला म्हणून पोलिसांनी मारहाण केली.
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द ?
- महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही – सुप्रिया सुळे
- ‘कॉंग्रेसच्या काळात लता मंगेशकरांचा अपमान’; पंतप्रधानांचा हल्लाबोल
- “मला त्यांनी दोन तीनदा संघात येण्याचे निमंत्रण दिले..” ; विराट कोहलीचा गौप्यस्फोट


