Share

गोव्याच्या स्वातंत्र्यावरून मोदींचा पुन्हा नेहरूंवर निशाणा

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तसेच भाजप सरकार वेळोवेळी जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यावर टीका करत असतं. लोकसभेत लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण केलं. यावेळी देखील मोदींनी नेहरूंवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसवर हल्लाबोल कायम ठेवला आहे. पंडित नेहरूंना गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची जास्त चिंता होती म्हणून गोव्याला १५ वर्षे उशीरा स्वातंत्र्य मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यावरून (Goa Independence) मोदींनी नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सरदार पटेल यांनी ज्या प्रकारे हैदराबाद, जुनागडसाठी धोरण आखलं होतं, त्याचप्रमाणे त्यांनी गोव्यासाठी धोरण आखलं असतं तर गोव्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी १५ वर्षांपेक्षा जास्त वाट पाहावी लागली नसती. त्यावेळच्या मीडिया रिपोर्ट्सवरून असं दिसून येतं की, तत्कालीन पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय प्रतिमेची काळजी होती, असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, भारताच्या बंधू-भगिनींवर गोळीबार होत होता पण तत्कालीन पंतप्रधानांनी लष्कर पाठवण्यास नकार दिला होता. अशा परिस्थितीत गोव्यातील अनेकांना आपल्या प्राणाचा त्याग करावा लागला. १५ ऑगस्ट १९५५ रोजी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहरुंनी गोव्यात लष्करी कारवाई करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं, असंही मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!