पुणे: भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी आयुष्यभर जमीनी लाटण्याचे काम केले आहे, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. अजित पवार हेलिकॉप्टरमधून कोणाची जमीन शिल्लक आहे का हे शोधत असतात, असा घणाघात देखील पाटील यांनी केला आहे. ते मंजरी बुद्रुक येथे बोलत होते.
अजित पवार (Ajit Pawar) धरणाची देखील जागा सोडत नाहीत, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अजित पवारांनी या आधी अनेकदा चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ असा उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तर पाटलांच्या अनेक आरोपांना उत्तर न देता आपण त्यांना महत्व देत नसल्याचं अजित पवारांनी सुचवलं होतं.
मात्र आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर अजित पवार काही उत्तर देणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेत राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना देखील आता सर्वत्र बघायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
मुंडे बंधू – भगिनीमधील वाद पुन्हा शिगेला, धनंजय मुंडे म्हणाले कि…
वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याकरता या चार खेळाडूंचे पुनरागमन


