Share

गोव्याच्या राजकारणाबद्दल काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..

Published On: 

मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात देशातील ५ राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात देशातील उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यात नवीन विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या सर्व पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. देशातील सर्वात छोटे राज्य असणाऱ्या गोवा राज्यात एकाच टप्यात निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन प्रमुख राजकीय पक्षांमध्येच गोवा विधानसभा जिंकण्यासाठी स्पर्धा होणार आहे.

गोव्यात सध्या निवडणुकांच्या तोंडावर जाहीरनामे आणि आश्वासनांचा पाऊस पडतोय. भाजपच्या जाहीरनाम्यातही गोव्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी  हेही गोव्यात प्रचाराला पोहोचले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीकरता प्रचार करत असताना त्यांनी म्हंटले कि, ” देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा राज्याला दिशा दिली.  पर्यावरण, रोजगार, आयटी क्षेत्राला पर्रिकरांनी दिशा दिली आणि त्यामुळे गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे देखील गोवा राज्याला मनोहर पर्रीकर यांनी दाखवलेलया मार्गावर पुढे नेत आहेत.

तसेच गोव्यात केलेल्या कामाचा पाढाही वाचून दाखवला. राष्ट्रीय महामार्गासाठी मोठा निधी दिला. येणाऱ्या काळात गोव्याला 25 हजार कोटी दिले आहेत. 12 हजार कोटी सागरमाला अतंर्गत गोव्यासाठी पैसे दिलेत. तसेच गोव्याला पुढील पाच वर्षात एकूण 40 हजार कोटी दिलेत, असे गडकरी म्हणाले आहेत. यामुळे गोव्यातील सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग बनलेले असतील, गोव्यात क्रांतिकारक बदल होतील, तसेच नवीन रोजगाराची निर्माती असेही त्यांनी सांगितलं. गोवा राज्याच्या राजकारणात आधी ऐनवेळी पक्ष बदलणे हे परंपरा खूप मोठ्या प्रमाणात होती, मात्र गेले १० वर्ष भारतीय जनता पक्षाने गोवा राज्यात स्थिर सरकार दिल आहे. त्यामुळे गोवा राज्याला स्थिरता लाभली आहे. तसेच गेल्या १० वर्षांच्या भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणामुळे गोवा राज्यात अनेक उत्तम पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

त्यांनी यावेळेज इलेकट्रीक वाहनांवर पण भाष्य केले आहे, येत्या काहीच काळात इलेकट्रीक वाहनांची किंमत पण इतर वाहनांसारखीच असेल अशी ग्वाही त्यांनी या वेळेज दिली. तसेच आम्ही आगामी काळात गोवा राज्यात पण इलेकट्रीक बसची संख्या वाढवणार आहोत, त्यामुळे गोवा राज्यात आगामी काळात प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल असेही ते म्हणाले.

       महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!