सांगली : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यात निवडणुकांचंही वारंही घुमू लागलं असल्यांमुळे आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीलाही लागले असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये टोलेबाजीचे प्रमाण वाढतं आहे. अशातच भाजप पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?
बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस धनगर समाजाचा वैचारिक शत्रू आहे, असा एकेरी उल्लेख करत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला केला आहे. गोपीचंद पडळकर काल सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणातून विरोधकांना लक्ष्य केलं.
पडळकर म्हणाले की, राज्यात जिथे मेंढपाळ जातील, तिथे त्यांना मारहाण होतेय. काहीही कारण नसताना त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. धनगर समाजाचे सगळे विषय आता मी समजून घेत आहे. आता केवळ राजकीय विषय बाकी आहे. राजकारण आणि सत्ताकारणात तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचा वैचारिक शत्रू बारामतीचा शरदचंद्र पवार नावाचा माणूस आहे, हे लक्षात ठेवा.
तुम्ही सर्वांनी दरवर्षी एकत्र यायला हवं. तुम्ही मला खाली बसवा, मी खाली बसायला तयार आहे. दुसऱ्याला बोलायला व्यासपीठावर बोलवा. आरेवाडीचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राचं परिवर्तन केंद्र बनू शकतं. येथे केवळ एकाच समाजाची लोकं येत नाहीत. इथे मराठा समाजासह बहुजन, अठरापगड जातीची आणि बारा बलुतेदारांची लोकं येतात. आरेवाडी हे एक शक्तीकेंद्र बनत असल्याचंही पडळकरांनी सांगितलं.
तसेच, आपल्यातील काही लोकं उद्घाटन आणि जयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी शरद पवार हेलिकॉप्टरमधून आले होते. दरम्यान, आपल्यातील सर्वजण डोक्यावरील टोपी खाली पडेपर्यंत हेलिकॉप्टरकडे पाहत साहेब आले, साहेब आले,असं म्हणत ओरडत होते. परंतू त्यांना सांगू इच्छितो की, त्या हेलिकॉप्टरमध्ये तुमचा साहेब नाही तर, बहुजनांचा कर्दनकाळ बसला असल्यांचंही पडळकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole | ‘वंदे मातरम’ ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता?; नाना पटोलेंनी सांगितले ‘हे’ दोन पर्याय
- shane watson । जसप्रीत बुमराह टूर्नामेंटमधून बाहेर पडणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का – शेन वॉटसन
- Travel Update | दिवाळीच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ‘या’ जागांचा नक्की करा विचार
- Narayan Rane | बाळासाहेब जिवंत असते तर उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते – नारायण राणे
- Health Tips | काजू खाल्याने शरीर राहते निरोगी, जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

