Share

शपथविधी सोहळ्याचे साधे निमंत्रणही न मिळालेल्या घटक पक्षांना आता महामंडळाची आशा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडी अर्थात उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र अशातचं आघाडीचे घटकपक्ष हे शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण नसल्याने नाराज झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आणि शेकापचे नेते जयंत पाटील हे नाराज असल्याचं बोलल जात आहे. या दोन्ही घटक पक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत सहभागीही करून घेतले नसल्याचं बोललं जात आहे. तसेच आजच्या शपथविधी सोहळ्याचेही निमंत्रण त्यांना दिल नसल्याच सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक पक्ष हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

हे दोन्ही पक्ष स्वाभिमानी बाणा जपत असताना तिकडे पीपल रिपब्लिकन पक्षाला महामंडळात स्थान मिळेल अशी आशा आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्र पक्ष म्हणून आम्हाला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नसले तरी भविष्यात ही संधी मिळेल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया पीपल रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांनी दिली.

ठाण्यात एका खासगी कार्यक्रमात कवाडे आले असता, त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले, आघाडीच्या विजयात आणि पराभवात त्यांची साथ कधी सोडली नाही. त्यामुळे भविष्यात सत्ता वाटपाच्या वेळी आम्हाला संधी दिली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!