Share

राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका – धनंजय मुंडे

Published On: 

बीड : कोरोनाने देशभरात हाहाकार माजवला आहे. राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. मात्र यासगळ्यात उसतोड कामगारांचे अतोनात हाल होत असल्याची भयानक चित्र समोर आलं आहे.

विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस काही ठिकाणी सुरू झालेला आहे.त्यामुळे अनेक ऊस तोडणी मजुरांचे हाल होत आहेत. अनेकांच्या या वादळामध्ये झोपड्या पडलेल्या आहेत. त्यांना दिलेले धान्य पूर्णपणे भिजून गेलेले आहे.आणि आशा कठीण परिस्थिती मध्ये ऊस तोडणी मजूर याठिकाणी जगत आहेत. अशात उसतोड कामगारांची व्यवस्था करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी भावना आता जनमानसातून येत आहे.

याच मुद्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले होते. इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलय, आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करुन त्यांच्या ताटात माती? ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत. मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!’ अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

आता पंकजा मुंडे यांच्या या टीकेला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त साखरकारखाना परिसरात झालेल्या वादळाने कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या पालांचे नुकसान झाले. माझ्या सूचनेवरून प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह कारखान्याचे एमडी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, मजुरांची योग्य व्यवस्था केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

तर अधिक नुकसान झालेल्या ऊसतोड मजुरांना त्वरित शिरोळ येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्थलांतरित केले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू, किराणा आदी पुरवण्यात आले. ऊसतोड मजुरांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर शुगर कमिशनर, जिल्हाधिकारी, प्रांत तहसीलदार यांच्याशी मी सतत संपर्कात आहे. अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात विखुरलेल्या ऊसतोड मजुरांना टप्प्याटप्प्याने स्वगृही आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. मजुरांची संख्या, त्यांची आरोग्य तपासणी, गावकऱ्यांची सुरक्षा याचा विचार करून आज निर्णय घेतला जाईल. राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका. असे देखील धनंजय मुंडेंनी टीकाकारांना सुनावलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!