🕒 1 min read
मुंबई : राज्यातील रायकीय वातावरण सध्या खूप गढूळ झालं आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका, टिपण्णी सुरू आहे. अशातच भाजप पक्षाचे नेचे गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबईतील भायखळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे असलेले नाट्यगृह बंद असून, यासंदर्भात पडळकरांनी पत्र लिहिलं असल्यचं समजतं आहे.
गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले आहे ?
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटगृहाच्या उद्घाटनाचे काम 17 महिन्यांपासून रेंगाळलेलं असून, ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं नाट्यगृह लोककलाकार रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुरू करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. पत्रामध्ये लिहिलं आहे की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक प्रखर आवाज, वंचित बहुजनांच्या वेदनेला आपल्या साहित्य, पोवाडे, लावण्यांमधून जागतिक पातळीवर पोहचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. त्यांच्या स्मृतींमधून आजही आपणाला प्रेरणा मिळते. परंतु, गेल्या तब्बल 38 वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने भायखळा येथे असलेले नाट्यगृह बंद पडले आहे. त्या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठेंच्या कर्तृत्वाचा अपमानच होतोय. ही मोठी शोकांतिका आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 2014ला प्रस्ताव तयार केला. त्यानंतर 750 आसन क्षमतेचं सभागृह उभं राहिलं. 2021 पासून 17 महिने उलटले तरी हे सभागृह उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. आता बहुजन हिताचा विचार करणारे कार्यक्षम सरकार सत्तेवर आहे. नुकतेच देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांमुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु, मुंबई येथील सभागृह उद्घाटनाचे काम 17 महिन्यांपासून रेंगाळलेले आहे ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाचं नाट्यगृह लोककलाकार रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी सुरू करावे. हाच खरा लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्य साधनेचा गौरव असेल.
गेली 38 वर्षे आण्णाभाऊ साठे सभागृहावर पडदा पडला आहे. 1963 पासून लावणी, भारुड इत्यादी लोककलांच्या सादरीकरणासाठी या खुल्या रंगमंचाचा वापर केला जात होता. 450 प्रेक्षकांसाठी हे खुलं नाट्यगृह महापालिकेने सुरु केले होते. पण, 1984 ला हे नाट्यगृह बंद करण्यात आले. 2003 पर्यंत पडीक असणाऱ्या सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव चर्चेत आला. त्यावेळी 13 कोटींचा खर्च अपेक्षित होता. परंतु, तत्कालीन आघाडी सरकारने निधी देण्यास नकार दिल्यामुळे हे सभागृहाचे काम रखडले, असल्याचं पत्रामध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Breaking News । ऋतुजा लटकेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा ; महापालिकेला राजीनामा मंजूर करण्याचे दिले आदेश
- Diwali 2022 | यावर्षी दिवाळी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त कधी आहे? जाणून घ्या
- Bachchu Kadu | दोन दिवस आधीच शेतकऱ्यांना मदत मिळाली – बच्चू कडू
- Eknath Shinde | शिंदे व उद्धव ठाकरे या दोघांच्या भानगडीत बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली – एकनाथ खडसे
- Nitesh Rane । “ठाकरे रमेश लटके यांना कितीवेळा भेटले?”; नितेश राणे यांचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
