नवी दिल्ली : भारताचे दिग्गज माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी मयंक अगरवाल आणि शुभमन गिल यांच्याबद्दल एक प्रतिक्रया दिली आहे. ते म्हणाले की मयंकने भारतीय पिचवर चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संधी द्यायला हवी. शुभम गिलने मागील काही दिवसांपासून एकही कसोटी सामना खेळला नाही. त्यामुळे त्याच्याकडून संघाची सलामी करू नये.
स्पोर्ट्स तकशी, बोलताना गावसकर म्हणाले की, “भारतीय संघ व्यवस्थापनेने मयंकला जास्तीत जास्त संधी द्यायला हवी. गिल मागील दोन महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नाही. जर तुम्हाला भारतासाठी खेळायचे असेल तर त्यासाठी सरावात असणे गरजेचे असते. निश्चितच गिल एक चांगला खेळाडू आहे. परंतु तुमचा फॉर्म खूप महत्वाचा असतो.
गावसकर पुढे म्हणाले, मयंकने भारतात चांगले प्रदर्शन केले आहे. तो भारतात एका बॉस प्रमाणे फलंदाजी करतो. परंतु विदेशात नाही. घरच्या मालिकेत तो प्रत्येकवेळी एक तरी शतक करतो. त्यामुळे त्याला सलामी फलंदाज म्हणून संधी द्यायला हवी. तर तिसऱ्या नंबरला हनुमा विहारी खेळेल.”
महत्वाच्या बातम्या :


