🕒 1 min read
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा फिटनेस आणि त्याची खेळाबद्दलची आवड जगाला माहिती आहे. कोणत्याही क्षणी कोहली आपल्या संघासाठी १०० टक्के देण्यास मागेपुढे पाहत नाही. त्याच्या आक्रमक वृत्तीने मैदानात निर्माण झालेली ऊर्जा खेळाडूंपासून प्रेक्षकांपर्यंत खेळाशी गुंतून ठेवण्याचे काम करते. विराटच्या खेळाप्रतीच्या प्रेम आणि कर्तृत्वाचा किस्सा भारतीय संघाच्या माजी फिजिओ सांगितले आहे.
विराट कोहलीने (virat kohli) २०११ च्या विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील पहिली मोठी स्पर्धा खेळली. फार कमी लोकांना माहीत असेल की, पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वी विराट कोहलीला मान आणि जबड्यात असह्य वेदना होत होत्या. असे असतानाही त्याने आपल्या संघासाठी मैदानात पाकिस्तानविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला होता. माजी फिजिओ आशिष कौशिक यांनी ही माहिती दिली आहे. “विराट कोहलीची वेदना सहन करण्याची क्षमता देखील आश्चर्यकारक आहे, काही खेळाडू इतरांपेक्षा वेदनांनी जास्त प्रभावित आहेत परंतु कोहली खूप वेगळा आहे. मला आठवते की २०११ च्या विश्वचषकापूर्वी त्याच्या मान आणि जबड्यात खूप वेदना होत होत्या. विश्वचषकाची उपांत्य फेरी मोहालीत खेळवली जाणार होती, पण त्याने वेदना अगदी हलक्यात घेतल्या. आणि सामना खेळला.”
विराट कोहली २०११ नंतर २०१६ मध्येही आयपीएलमध्ये हाताला ६ टाके पडले असतानाही फलंदाजी करण्यास उतरला होता. विराट २०११च्या त्या सामन्यात केवळ ९ धावा करून बाद झाला होता. मात्र त्याने संघासाठी दाखवलेली हिंमतीचे मोठे कौतुक झाले. त्या विश्वचषकानंतर विराटने आपल्या कारकिर्दीत मैलाचे दगड मिळवले. ज्यात त्याने भारतचे नेतृत्व केले आणि तो क्रिकेट जगतातील स्टार बनला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले…
- “दाऊदच्या हस्तकाकडून मिळालेल्या पैशातून भाजपचा मोर्चा”, राऊतांचा मोठा दावा
- रशिया जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ‘अस्पृश्य’ झाला- बायडन प्रशासन
- सुपरस्टार ‘प्रभास’ अडकतोय लग्न बंधनात..! पहा कोण आहे मुलगी ?
- अश्विनने शेन वॉर्नच्या “मजबूत खांद्या”मागील गोष्ट केली शेअर!

