सातारा : खा.उदयनराजे यांच्यावर आ.शिवेंद्रराजेंनी यांनी घणाघाती टीका केली आहे. “खा.उदयनराजे रात्री मोठ्या आवाजात गाणी लावून गाडीवर स्टंट करतात हे त्यांचे डोंबारी खेळ म्हणावेत का” अशी थेट टीका उदयनराजेंवर केली आहे. असा खेळ सातारकरांनी त्यांच्या वाढदिवसाला देखील बघितला आहे असे म्हणत आ.शिवेंद्रराजेंनी म्हणाले.
खा.उदयनराजेंच्या टीकेवर आ.शिवेंद्रराजेंचे प्रत्युत्तर –
सातारा नगरपालिकेची निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे तसे सातारच्या दोन्ही राजांचे आरोप प्रत्यारोपण सुरू आहेत असे दिसत आहे. खा.उदयनराजेंनी नुकतीच साताऱ्यातील एक सोसायटी ताब्यात घेतली. यावेळी विजयी उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना खा.उदयनराजेंनी आ.शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देत आ.शिवेंद्रराजें म्हणाले, साताऱ्यात रात्री मोठ मोठ्याने गाणी लावून गाडीचे स्टंट करतात? हे म्हणजे त्यांचे डों….बारी खेळ आहेत! असे म्हणत उदयनराजेंवर घणाघाती टीका केली आहे.
उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने, निलेश साबळेच्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदयनराजेंनी फिल्मी स्टाईल गाडीवरून एन्ट्री केली होती. यावर गाणी लावून गाडीवर स्टंट करतात का? हे त्यांचे ‘डोंबारी खेळ म्हणावेत का’? असे म्हणत आ.शिवेंद्रराजेंनी टीका केली.
महत्वाच्या बातम्या –


