नवी दिल्ली : भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीबद्दल माजी क्रिकेटर चंदू बोर्डे यांनी एक खुलासा केला आहे. ही गोष्ट बऱ्याच कमी लोकांना माहित असेल. की बोर्डे यांच्या म्हणण्यानुसार विराट कोहली जेव्हा १७-१८ वर्षांचा होता. तेव्हा बीसीसीआयने त्यांना त्याच्या कोचिंगसाठी पाठवले होते.
न्युज १८ बरोबर बोलताना बोर्डे म्हणाले, “विराट १७-१८ वर्षांचा असताना मोहाली येथे नॉर्थ जोनचा एक कोचिंग कंप लागला होता. कोहलीही त्याचा हिस्सा होता. या कंप साठी बीसीसीआयने मला तिथे कोचिंग करण्यासाठी पाठवले होते. मी विराटला सराव करताना पहिले तेव्हा तो खूप अग्रेसीव होता. जेव्हा मी त्याला त्याची एखादी कोणती गोष्ट चुकली आहे. असे सांगितली तर तो लगेच नेटमध्ये जाऊन ती सुधारायचा.
तो ती अडचण जो पर्यंत सुधारत नाही तो पर्यंत प्रयत्न करत राहायचा. लहान पासूनच तो एक चांगला खेळाडू आहे. तो सिनियर खेळाडूंचा खूप आदर करतो. दोन वर्षांपूर्वी मी त्याला भेटलो होतो, तेव्हा त्याने माझा खूप आदर केला होता.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

