मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवारांचा हल्लाबोल केला आहे . 125 तास रोकॉर्डिंग करणं सहज शक्य आहे असं वाटत नाही असे शरद पवार म्हणाले. रेकॉर्डिंगसाठी यंत्रणांचा गैरवापर केल्याचे नाकारता येत नाही असे देखील त्यांनी म्हंटले आहे. रेकॉर्डिंगच्या सत्यतेची पडताळणी गरजेची, सरकारनं चौकशी करावी. असे देखील शरद पवार म्हणत आहेत.
“माझं अप्रत्यक्ष नाव घेतलं मात्र माझा संबंध नाही असे शरद पवार म्हणत आहेत. मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, सत्तेचा गैरवापर करून चौकशी कशी केली जाते याचं उदाहरण देशमुख. केंद्रातील गैरवापर करून अनिल देशमुखांची चौकशी. असेही शरद पवार म्हणाले सरकारी अधिकाऱ्याची 125 तासांची रेकॉर्डिंग झाली. रेकॉर्डिंगसाठी शक्तीशाली यंत्रणेच्या वापराची शक्यता. अनिल देशमुखांच्या विरोधात 90 छापे टाकण्यात आले.
फडणवीसांनी आम्ही अजून खोलात गेलो नाही असे प्रत्त्युत्तर दिले आहे. आम्ही योग्य पद्धतीने पाठपुरावा करू असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


