🕒 1 min read
मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटानं प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांवर जादू केली. चित्रपटातील संवादांपासून गाण्यांपर्यत आणि अगदी त्यातील स्टाईलपर्यंत सर्वकाही सिनेरसिकांना वेड लावून गेलं. रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाचा डंका ओटीटी वरही पाहायला मिळाला. रिल्स म्हणू नका किंवा गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन, प्रत्येक ठिकाणी पुष्पा आणि फक्त पुष्पाच.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवजात बालकानंही या चित्रपटातील स्टाईल, कॉपी केली आहे. ‘मैं झुकेगा नहीं’ या डायलॉगवर हा चिमुरडा पुष्पाप्रामाणंच त्याच्या हनुवटीखालून हात फिरवताना दिसत आहे. बरं, तोसुद्धा हुबेहूब अल्लू अर्जुननं फिरवला तसाच. अवघ्या काही सेकंदांमध्ये हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आणि ट्रेंडही करु लागला. बरं जन्माला आलेल्या या बाळाचं नाव पुष्षाच ठेवायचं का, असे प्रश्नही नेटकऱ्यांनी कमेट बॉक्समध्ये केले.
https://www.instagram.com/reel/CayiowAFT9x/?utm_medium=copy_link
काहींना तर हा ज्युनिअर पुष्पा वाटला, अरेच्छा… हे केव्हा झालं असे मिश्किल प्रश्नंही काहींनी केले आहेत. दाक्षिणात्य कलाजगताची देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेली लोकप्रियता नेमकी किती आहे हेच हा व्हिडीओ पाहताना लक्षात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
