🕒 1 min read
मुंबई : टेलिव्हीजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉयचा (Actress Mouni Roy) एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता तिला सेल्फीसाठी मागून स्पर्श करताना दिसत आहे. चाहत्याकडून अचानक गैरवर्तन झाल्याने ती गोंधळून गेली अन् स्वत:ला सावरतांना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ( social media) जुहूमधील एका डबिंग स्टूडिओ (dubbing studio in Juhu) बाहेरील आहे. मौनी रॉय नुकतीच बाहेर पडली असता तिला चाहत्यांनी घेरले होते. या व्हिडीओमध्ये मौनीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. ती तिच्या चाहत्यांना भेटत असताना मागून एक व्यक्ती आला आणि सेल्फीसाठी तिला हात लावून बोलावण्याचा प्रयत्न केला. मौनी रॉयला चाहत्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताच गैरवर्तन कृती पाहून मौनी रॉयच्या तोंडून ‘अरे’ बाहेर पडले आणि ती गोंधळून गेली.
https://www.instagram.com/reel/CXN432QDo8n/?utm_source=ig_web_copy_link
गेल्या काही दिवसांपासून मौनी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. ती जानेवारी २०२२मध्ये बॉयफ्रेंडशी लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. नुकतेच मौनी रॉय तिचा आगामी चित्रपट ‘वल्ले’मुळे (film ‘Valle’) चर्चेत असून या चित्रपटात मौनीसोबतच अभय देओल आणि करण देओल (Abhay Deol and Karan Deol ) मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, मौनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- समीर वानखेडेंनी केली कामाला सुरुवात; ‘या’ ठिकाणी टाकली धाड
- ‘द्रविडची प्रशिक्षकपदी निवड झाली तेव्हाच विराटला कर्णधारपदावरून हटवणार हे निश्चित होतं
- मुलाच्या आठवणीत शिखर धवनने शेअर केली हृदयस्पर्शी पोस्ट
- ‘एसटी संप चिघळवून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा डाव’
- ‘महाराष्ट्राचा मुस्लिम हातात तिरंगा घेऊ शकत नाही का?’
- प्रणवदांच्या सल्ल्याशिवाय सोनिया गांधी कोणताही निर्णय घेत नसत-छगन भुजबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
