Share

75th Independence Day | भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी होणार ‘ही’ अमेरिकन गायिका

Published On: 

महाराष्ट्र देशा डेस्क: लोकप्रिय आफ्रिकन-अमेरिकन गायिका मेरी मिलबेन भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने (ICCR) याबद्दल माहिती दिली आहे. मेरी मिलबेनने भारताचे राष्ट्रगीत तिच्या स्टाईलमध्ये गायलं होतं. तर ‘ओम जय जगदीश हरे’ हे गाणं देखील तिने गायलं होत. यामुळेच ती भारतात प्रसिद्ध झाली.

ICCR ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, मेरी मिलबेन हिला स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून तिने भारतात येण्यास होकार दिला आहे. मिलबेन ही पहिलीच अमेरिकन कलाकार आहे जिला ICCR ने स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. मेरी मिलबेन या समारंभात भारताचे राष्ट्रगीत गाणार आहे. मेरी ही अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी अधिकृत पाहुणी असेल. यावेळी मिलबेन पहिल्यांदाच भारतात सादरीकरण करणार आहे. हा सोहळा 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पार पडणार आहे.

https://www.instagram.com/reel/CgUVvaqgkG5/?utm_source=ig_web_copy_link

मेरी म्हणाली, मला अभिमान वाटतो…
या आमंत्रणानंतर मेरी मिलबेन हिने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली कि, “1959 मध्ये भारत भेटीवर आलेल्या डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांच्या पावलावर पाऊल ठेवून, मला भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सांस्कृतिक राजदूत म्हणून युनायटेड स्टेट्सचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. याचा खूप अभिमान वाटत आहे. मी भारताच्या स्वातंत्र्याच्या या महत्त्वपूर्ण उत्सवादरम्यान या मौल्यवान मातृभूमीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहे. युनायटेड स्टेट्स आणि भारत यांच्यातील लोकशाहीच्या नात्याला दृढ करण्यासाठी उत्सुक आहे.”

पुढे ती असेही म्हणाली, “मी भारताच्या पहिल्या प्रवासाची तयारी करत असताना, माझ्या मनाला डॉ. किंग यांचे शब्द आठवत आहेत. ते म्हणाले होते कि, इतर देशांमध्ये, मी एक पर्यटक म्हणून जातो. पण भारतात मी यात्रेकरू म्हणून जातो.” तर मिलबेन ही तिच्या भारत दौऱ्यादरम्यान दिल्लीशिवाय लखनऊला देखील जाण्याचा विचार करत आहे, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!