Share

सोलापूरच्या शहिद जवान रामेश्वर काकडेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार!

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : २०१२ साली सैन्यदलात रुजू झालेला, शहीद जवान रामेश्वर काकडे हा सोलापुरातल्या बार्शीतील बुधवारी छत्तीसगड येथे कर्तव्यवार असताना शहीद झाला. रामेश्वर काकडे हे बार्शीतील गौडगाव येथील रहिवासी होते. रात्री दीड वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

२०१२ साली सैन्यदलात रुजू झाल्यानंतर रामेश्वर काकडेंनी विविध भागात सेवा बजावली. सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर भागात कार्यरत होते. बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यानंतर यांना उपचारासाठी सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

काल रात्री उशिरा त्यांचे पार्थिव शरीर बार्शीत दाखल झाले. तर रात्री दीड वाजता त्यांचे मूळ गाव गौडगाव येथे शासकीय इतमामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील वैजिनाथ काकडे यांनी मुखाग्नी दिला. तर यावेळी सिआरपीएफच्या वतीने मानवंदना देखील देण्यात आली. रात्री उशीर झालेला असताना देखील संपूर्ण गाव शहीदाला अखेरचा सलाम देण्यासाठी हजर होते.

शहीद रामेश्वर काकडे यांना अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शहीद काकडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने हे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!