Share

शोएब अख्तरचे सेहवागबाबत धक्कादायक वक्तव्य; म्हणाला “मैं एक दिन बोहोत मारुंगा”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर हे त्यांच्या देशांसाठी चॅम्पियन खेळाडू आहेत. भारताकडून फलंदाजी करणारा वीरू त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जात असताना, अख्तर वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. या दोघांमध्ये मैदानावर रंजक चुरस दिसायची. मात्र मैदानाबाहेर त्यांची घट्ट मैत्री दिसली. मात्र आता अख्तरने विरुबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.

सेहवाग (virender sehwag) आणि अख्तर (shoaib akhtar) यांची सोशल मीडियावर नेहमी मज्जा मस्ती सुरु असते. एकदा अख्तरने विरुच्या टक्कल डोक्याची खिल्ली उडवली होती. त्यानंतर विरूने अख्तरच्या सूट मधील फोटो खाली त्याला ‘वेटर’ म्हटले होते. अख्तर आणि तन्मय भट यांच्यातील यूट्यूब वरील एका व्हिडिओत हा किस्सा घडला. जेव्हा ट्विटरवर हाच फोटो आला आणि प्रत्येकजण प्रचंड हसताना दिसले. शेवटी, अख्तर म्हणाला, “इसको तो मै मारुंगा बोहोत एक दिन (मी त्याला एक दिवस खूप जोरात मारीन).”

अर्थात, हा अख्तरकडून सेहवागचा हा मैत्रीपूर्ण अपमान होता. सेहवाग क्रिकेटपटू आणि इतर व्यक्तिमत्त्वांवर अशा मजेदार कमेंट्स करण्यासाठी ओळखला जातो, परंतु त्याच्या जुन्या मित्र अख्तरची खोड काढताना त्याला सर्वात जास्त मजा येते. या दोघांमध्ये नेहमी सोशल मीडियावर थट्टा मस्करी सुरु असते. त्यांचे चाहतेही त्यांच्या गोष्टीतून मजा घेतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!