Share

बाबर आझमचे कौतुक करताना इम्रान खानचा “फिक्सिंग” बद्दल मोठा खुलासा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला जात होता, जो अनिर्णित राहिला. पाकिस्तानने हा सामना जवळपास गमावला होता, पण बाबर आझमची दमदार खेळीने पाकिस्तानला हा सामना हरण्यापासून वाचवला. बाबर आझमने १९६ धावांची शानदार खेळी केली. बाबरचे पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कौतुक केले आहे.

माजी पाकिस्तानी खेळाडू आणि सध्याचे पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांनी बाबर आझमसह (babar azam) इतर खेळाडूंचे कौतुक केले आहे. ट्विट करताना इमरानने लिहिले की, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त झुंज दिल्याबद्दल आणि कर्णधारपदाची उत्तम खेळी खेळल्याबद्दल बाबर आझमचे अभिनंदन आणि उर्वरित संघाला शुभेच्छा. विशेषतः मोहम्मद रिझवान आणि अब्दुल्ला शफीक.” मात्र यानंतर त्यांनी परत ट्विट केले ज्याने क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी खेळाडूंचे कौतुक केल्यानंतर आणखी एक ट्विट शेअर केले आहे, ज्यात त्यांनी फिक्सिंगबद्दल सांगितले, “दुर्दैवाने मी हा सामना पाहू शकलो नाही. कारण मी मॅच फिक्सिंगच्या विरोधात लढत आहे जिथे माझ्या खेळाडूंना आमिष दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जात आहे!” त्यांच्या या ट्विटनंतर खळबळ माजली आहे. तथापि, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम आणि निर्णायक कसोटी सामना २१ मार्चपासून लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना जो संघ जिंकेल तो या ऐतिहासिक कसोटी मालिकेचा विजेता ठरेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!