🕒 1 min read
पुणे : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुन्हा एकदा अश्याच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पुण्यामध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संभाजी भिडे म्हणाले की,‘आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचे बलिदान केले तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य भिडे यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
यावेळी बोलत असतांना संभाजी भिडे म्हणाले की,‘आज संभाजी महाराज, औरंगजेब नाही. परंतु आजही औरंगजेब पाकिस्तान, बांगलादेश गाव वस्त्यांमधील मुस्लिमांच्या रुपाने शिल्लक आहे. परंतु संभाजी महाराजांची जी आग होती ज्यात त्यांनी ऐन तारुण्यात आपल्या देशाचा आणि धर्माचा अभिमान न सोडता, न झुकता, न मागे सरकाता, न शरण जाता त्यांनी देश देवाचा अभिमान मनात धरुन मरण पत्करले परंतु इस्लाम स्वीकारला नाही. आजही ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबने संभाजी महाराजांचे बलिदान केले. तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे’, असे भिडे म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘हा शत्रू अनेक रुपात गावोगावी हिंदुस्तानमध्ये नांदतोय, हिंदुस्तानच्या बाहेरही नांदतोय’, असेही भिडे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शोएब अख्तरचे सेहवागबाबत धक्कादायक वक्तव्य; म्हणाला “मैं एक दिन बोहोत मारुंगा”
- बाबर आझमचे कौतुक करताना इम्रान खानचा “फिक्सिंग” बद्दल मोठा खुलासा!
- Breaking News : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या २० पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
- एमसीसीच्या मंकड नियमावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…
- Pakistan Missile Test: हवेत झेपावताच पाकिस्तानची मिसाईल झाली फुस्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
