Share

‘पाकिस्तानविरुद्ध युद्ध आम्ही जिंकले तरी आम्हालाचं देशद्रोही म्हटलं जातंय’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष आता सक्रीय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत. अशीच टीका भाजपकडून कॉंग्रेसवर होत आहे. याला मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर दिले आहे.

काँग्रेसला शिव्या देवून काँग्रेस पक्ष संपणार नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी काँग्रेसला कितीही शिव्या दिल्या तरी काँग्रेस संपणार नाही. हिंदूचा मक्ता फक्त भाजपनेच घेतलाय, असे दाखवले जात आहे. आम्ही देखील हिंदू आहोत. पाकिस्तान विरुद्ध युद्ध जिंकणारे आम्हीच आहोत आणि आम्हालाच देशद्रोही म्हटले जात आहे. हे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला आहे.

तसेच पुढे बोलताना खर्गे यांनी ‘भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गरिबांचे आरक्षण रद्द करण्याचा डाव आहे. दुसरीकडे उच्च वर्णियांना दहा टक्के आरक्षण मिळावे, यासाठी संसदेत निर्णय घेतला जातो. ही विसंगती देशासाठी धोकादायक आहे. तर पाकिस्तानला पराभूत करण्याचं काम काँग्रेसच्याही काळात झाले. पण त्याचे श्रेय लाटण्याचे काम आम्ही केलेले नाही, असे सांगत काँग्रेस नेत्यांच्या घामामुळेच महाराष्ट्र घडला आहे, हे भाजपने लक्षात ठेवावे असंही खर्गे म्हणाले आहेत.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना खर्गे यांनी हे विधान केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!