टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
आज सोलापूरमध्ये महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगता होणार आहे. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सोलापूरमध्ये सभा घेणार आहेत. यासभेत अमित शहांच्या उपस्थित कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपप्रवेश करणार आहेत. त्यामुळे आधीच कॉंग्रेस आणि अवस्था दयनीय आहे आणि अशातच आज अनेक नेते पक्षांतर करणार असल्याने निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची चिंता वाढणार आहे.
आज भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि त्यांचे वडील पद्मसिंह पाटील भाजपप्रवेश करण्याची शक्यता आहे. याविषयी खुद्द जगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादीला उस्मानाबादमध्ये मोठा धक्का बसणार आहे. त्यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही भाजपात प्रवेश जाणार आहेत.
राणा जगजीतसिंह पाटील, पद्मसिंह पाटील यांच्यासह आमदार बबन शिंदे, जयकुमार गोरे, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, रामराजे नाईक यांचाही भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.
- छगन भुजबळ यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – रामदास आठवले
- ‘मला राजकारणातून अलिप्त व्हावंस वाटतंय’
- ‘मुख्यमंत्री आरशासमोर उभे राहिल्यास त्यांना विरोधी पक्षनेता दिसेल’
- ‘पराभवाच्या छायेत असल्यानेच राष्ट्रवादीला आली छ.शिवाजी महाराजांची आठवण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

