Share

अवधूत तटकरेंच्या पक्षांतरावर सुनील तटकरेंनी केले भाष्य, म्हणाले…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पुन्हा एकदा काका पुतण्या वाद उफाळून येणार आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि खा, सुनील तटकरे यांचा पुतण्या अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार अवधूत तटकरे हे आपला निर्णय घ्यायला समर्थ असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांच्या खासदारकीला काल शंभर दिवस पूर्ण या पार्श्वभूमीवर ते काल पत्रकारांशी बोलत होते. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे, पुतणे आमदार अवधूत तटकरे तसंच भास्कर जाधव यांनी नुकतीच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली, त्यासंदर्भात तटकरे बोलत होते.

त्या पार्श्वभूमीवर अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेटही घेतली आहे. त्यामुळे अवधूत तटकरे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितल जात आहे. तसेच शिवसेनेने देखील तटकरे यांना पक्ष प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिल असल्याचं सांगितल जात आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अवधूत तटकरे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येतीय. अवधूत तटकरे हे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाठी ग्रीन सिग्नल मिळाले असल्याचं सांगितल जात आहे. तर अवधूत तटकरे येत्या २ दिवसात निर्णय घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितल जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु असतानाच तटकरे कुटुंबीयांसाठी हा मोठा राजकीय धक्का असेल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!