Share

काही जण ईडीला घाबरून गेले, काहीजण बेडीला घाबरून गेले, जयंत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा:- राज्यात विधानसभा निवडणूका काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन सर्वच पक्षांकडून राज्यात करण्यात आले आहे. यामध्येच राष्ट्रवादीकडून खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिव स्वराज्य यात्रा सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे.

शिव स्वराज्य यात्रा बीड येथे आली असता  जयंत पाटील यांनी सभेला संबोधित करताना त्यांनी जे नेते राष्ट्रवादी सोडून गेले त्यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले, काही जण ईडीला घाबरून गेले, काहीजण बेडीला घाबरून गेले तर काहीजण “सीडी “ला घाबरून गेले. ज्यांच्या मागे चौकशी लागली आहेत ते लोक जात आहेत . ज्यांचा घोटाळा असेल तो जातोय. दमदाटीला घाबरणारे जात आहेत, छत्रपतीच्या विचाराने आणि ताकदीने चालणारा एकाही मावळा शरद पवार साहेबांना सोडून जात नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतील गळतीवर उत्तर दिले. धनंजय मुंडेनी सीडी असे सुचवले यावेळी “सीडीचे” नाव काढताच सभेत मोठा हश्या यावेळी पिकला.

तसेच पुढे बोलतांना म्हणाले,राष्ट्रवादी सोडून जे जे नेते गेले त्यांच्या भानगडी विधानसभा निवडणुकीत सांगतो. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी पक्ष स्वच्छ होत आहे . घाबरट लोकांपेक्षा तरुण राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांना सोबत घेऊन पवार साहेबांच्या विचारातून नवा महाराष्ट्र घडवू, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ.अमोल कोल्हे, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सतिष चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यासह हजारो लोक सहभागी झाले होते.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हे भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत धनंजय महाडिक भाजप प्रवेश करणार असल्याचं सांगितल जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!