मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला मालदीवमध्ये मोठा सन्मान मिळाला आहे. रैनाची २०२२च्या मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये स्पोर्ट्स आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. श्रीलंकेचा दिग्गज माजी क्रिकेटर सनथ जयसूर्यासह फुटबॉल जगत आणि अॅथलेटिक्समधील १६ आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये रैनाला नामांकन मिळाले होते.
रैनाने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. एका प्रसिद्धीनुसार, हा कार्यक्रम १७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर रैनाने ट्विटरवर आयोजकांचे आभार मानले आहेत. ”आदरणीय इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि अहमद महलूफ यांचे आभार. जागतिक व्यासपीठावर सर्व जगज्जेत्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची भावना आश्चर्यकारक आहे. असा अप्रतिम पुरस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन”, असे रैनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
Thank you for the honour Honourable @ibusolih and Mr @AhmedMahloof. The feeling of representing India ???????? on a global platform among all the world champions is unmatchable. Congratulations on organising such an exclusive award ceremony. Way to go ???? #MaldivesSportsAwards2022 pic.twitter.com/VPNtIWh03K
— Suresh Raina???????? (@ImRaina) March 18, 2022
इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्सकडून खेळलेऱ्या रैनाने लीगमधील २०५ सामन्यांमध्ये ५५२८ धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. चेन्नईसह चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या रैनाला यावेळी लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही. गेल्या मोसमात तो चेन्नईकडून खेळला होता, पण त्याची कामगिरी काही खास झाली नव्हती.
रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
२००५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रैनाने भारतासाठी २२६ एकदिवसीय, ७८ टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळले आहेत. २०११मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात रैनाचाही समावेश होता. त्याने भारतासाठी ५६१५ एकदिवसीय आणि १६०५ टी-२० धावा केल्या आहेत. रैनाने वनडेमध्ये पाच शतके आणि ३६ अर्धशतके, तर टी-२०मध्ये एक शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. रैनाने कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांच्या मदतीने ७६८ धावा केल्या आहेत. रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६२ विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

