Share

धोनी -विराट नव्हे, ‘या’ खेळाडूला गंभीर मानतो सर्वोत्तम कर्णधार!

Published On: 

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर हा क्रिकेटशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडण्यासाठी ओळखला जातो. कोणत्याही तर्काशिवाय सरळ शब्दात केलेल्या विधानांमुळे गंभीर अनेकदा वादात सापडला आहे. आता त्याने विराट किंवा धोनी हे दोघेही त्याचे आवडीचे कर्णधार नसल्याचे सांगत एका दुसऱ्या खेळाडूचे नाव घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने (gautam gambhir) त्याची सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली होती. यामध्ये त्याने टीम इंडियाच्या सर्व महान खेळाडूंना स्थान दिले आहे. पण यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरने या प्लेइंग इलेव्हनचे कर्णधारपद सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat kohli) आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) यांना दिलेला नाही. गौतम गंभीरच्या मते अनिल कुंबळे हा भारताचा सर्वोत्तम कर्णधार आहे. कुंबळेला आपला आवडता कर्णधार असल्याचे सांगताना गंभीर म्हणाला “जर अनिल कुंबळेला धोनी आणि कोहलीप्रमाणे दीर्घकाळ कर्णधारपदाची संधी मिळाली असती, तर भारताला ही कामगिरी करता आली असती. कुंबळे मुळेच टीम इंडिया टेस्टमध्ये नंबर १ टीम बनू शकली.”

टीम इंडियाच्या इतिहासात अनिल कुंबळे आजपर्यंतचा सर्वात मोठा सामना विजेता ठरला आहे. आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने अनेक संस्मरणीय विजय भारताच्या नावे केले आहेत. भारताकडून कसोटी फॉरमॅटमध्ये ६१९ विकेट घेण्याचा विक्रमही अनिल कुंबळेच्या नावावर आहे, एवढेच नाही तर एका डावात १० विकेट घेण्याचा पराक्रमही कुंबळेने केला आहे. तसेच त्याने १४ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपदही भूषवले होते, ज्यात भारतीय संघ टेस्ट मध्ये नंबर १ ठरला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!