मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Banerjee) यांचा भाचा असलेले अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय तपास यंत्रणेने आज दिल्लीमध्ये बोलवले आहे. त्यांच्यावर ईडी चौकशी सुरु असून ‘मी सत्तेपुढे झुकणार नाही, दिल्लीच्या सत्तेपढे झुकणार नाही’, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut ) यांनी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल चा स्वभाव एकच असल्याचे म्हटले आहे. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण महाराष्ट्राला रोजच होत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील दुश्मनांना एकच धडा चारशे वर्षांपूर्वी घडवून दिला. महाराष्ट्र दुश्मना पुढे झुकणार नाही. वाकणार नाही. महाराष्ट्र लढत राहील. स्वाभिमानासाठी, हक्कांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि जर दुश्मन अंगावरती आला तर त्याची बोटे छाटली जातील. पंचवीस वर्षे लढून सुद्धा औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये मृत्यू पत्करावा लागला. हा शिवचरित्राचा इतिहास महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. हा इतिहास शिवसेनेच्या दुश्मनांनी समजून घ्यावा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आहे हे महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे.बाकी इतर प्रांतांना मात्र भूगोल आहे, हे विसरू नये. महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं त्यांनी करावे. त्यांचे व्यक्तिमत्त्व थोर आणि महान आहे. त्यांनी अख्या देशाला दिशा दिली आहे. असेही राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- VIDEO : “घरी कसं काय…सगळं बरंय?”, रोहितनं अर्जुन तेंडुलकरशी मराठीतून साधला संवाद!
- “लोकांना तुझा खेळ लक्षात आहे “; शोएब अख्तरने दिला शेन वॉर्नच्या आठवणींना उजाळा
- भाजपवाले कधीपासून हिंदू झालेत हे पाहावं लागेल- संजय राऊत
- सुशासन आणि लोकांची सेवा काय देते?; फडणवीसांकडून मोदींचे कौतुक
- “…त्यात विलन एक इच्छाधारी नाग असतो अन्”, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

