Share

नेमकं असं काय झालं की ; ‘मलायकाला’ मुला विषयी का वाटू लागलीय भीती..!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मलायका अरोरा त्यावेळी तिनं तिचा मुलगा अरहानची जबाबदारी स्वतःकडे मागून घेतली अन् अरबाजनही तिला ती सहज दिली. पण तेव्हा म्हणे खान कुटुंबियांकडून तिच्यावर भरपूर दबाव होता अशी अफवाही पसरली होती. त्यानंतर काही दिवसांतच मलायका-अर्जुन कपूरचं जुळलं आणि तिकडे अरबाजलाही गर्लफ्रेंड मिळाली. यात मुलगा अरहानची फरफट होईल असं अनेकांनी बोलून दाखवलं पण मलायकानं मात्र सिंगल मदर म्हणून स्विकारलेली जबाबदारी खूप उत्तमरित्या उचलली. मग नेमकं असं काय झालं अचानक की मलायकानं मुलगा अरहानला घेऊन मनात भीती आहे असं म्हटलंय.

आपण सर्वांनीच पाहिलं असेल की भले अरबाज-मलायका विभक्त झाले असले तरी अनेकदा ते त्यांच्या मुलासोबत एकत्र डिनरला दिसतात तर कधी त्याला एअरपोर्टवर गूडबाय करण्यासाठी एकत्र येतात तर कधी त्याला एअरपोर्टवर रीसिव्ह करायला आलेले दिसतात. त्या दोघांनीही मुलासाठी आपण अशापद्धतीनं एकत्र दिसू असं मागे स्पष्ट केलं होतं. मलायका देखील मुलाची जबाबदारी पार पाडण्यात कुठलीच कसर ठेवत नाही. पण नुकत्याच एका मुलाखतीत तिनं या जबाबदारीविषयी मनात दडपण, भीती आहे याचा खुलासा केला

“तिनं म्हटलं आहे,”मी अरबाजपासून विभक्त झाल्यावर अरहानची जबाबदारी ‘सिंगल मदर’ बनून पार पाडायचं ठरवलं. पण त्यावेळेपासून आजतागायत मनात भीती आहे,दडपण आहे. कारण अरहानला मार्गदर्शन करण्यात मी चुकले अन् तो वेगळा वागला तर बोटं माझ्यावर उठणार आहेत. मला माहित आहे मला नाव ठेवली जातील. त्यामुळे त्याला चांगलं घडवण्यात माझ्याकडून जे शक्य होईल ते मी करतेय. कारण उद्या तो एक चांगला माणूस घडला तर मी स्विकारलेली जबाबदारी मी पूर्ण केली असं सगळे म्हणतील. त्यामुळे मला कष्ट घ्यायचेत ते सिंगल मदर म्हणून यशस्वी होण्यासाठी,निव्वळ पैसा कमवत विशाल झेप घ्यायची नाही. यावेळी तिनं आपण मुलाला जीममध्ये जाण्यासोबतच योगा कर असा सल्ला आवर्जुन देतो असंही नमूद केलं. कारण योगा केल्यानं शरीरासोबतच मनाचे संस्कार जपले जातात असा माझा विश्वास आहे. आणि आता अरहानही माझ्या त्या मार्गदर्शनावर खरा उतरतोय याचा मला आनंद आहे”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!