🕒 1 min read
मुंबई : आता बॉलिवूडमध्ये अनेक क्रिकेटपटूंवर बायोपिकची निर्मिती केली जात आहे. महेंद्रसिंह धोनी, कपिल देव यानंतर आता या यादीत आणखी एका क्रिकेटपटूचे नाव जोडले जाणार आहे. क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा क्रिकेटमधील संघर्षमय जीवनावर आधारित लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कौन प्रवीण तांबे? असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे हा क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या प्रस्तावनेतून होते. यात श्रेयस तळपदे हा एका नवीन लूकमध्ये पाहायला मिळत आहे. त्यात त्याची एक अनोखी शैलीही पाहायला मिळत आहे.
Kaun hai Pravin Tambe? Cricket ka most experienced debutante, and the most inspiring cricket story never told.#KaunPravinTambe, trailer out on 9th March.#DisneyPlusHotstarMultiplex@legytambe @anjalipofficial @paramspeak @AshishVid @jaypraddesai pic.twitter.com/UD8ZqF1HyE
— Shreyas Talpade (@shreyastalpade1) March 7, 2022
या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यात फक्त प्रवीण तांबे याच्या क्रिकेट खेळण्याबद्दल नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले जाणार आहे. जवळपास २ मिनिटे ५१ सेकंदाच्या या ट्रेलरच्या सुरुवातील श्रेयस तळपदे गोलंदाजी करताना दिसत आहे. यानंतर त्याचा संघर्षही दाखवला जातो. यात त्याचे वैयक्तिक आयुष्य, नोकरी, टोमणे, लग्न आणि नंतर बायकोसोबत होणारी भांडणं या सर्व गोष्टी उलगडणार आहेत. नोकरी करत असतानाही प्रवीण तांबेने क्रिकेट सोडले नाही आणि त्यानंतर त्याने त्याचे स्वपन् कशापद्धतीने पूर्ण केले, याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटा पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये श्रेयस हा मी वय वैगरेवर विश्वास ठेवत नाही, असे सांगताना दिसत आहे.
प्रवीण तांबे यांचा जन्म ८ जून १९७१ रोजी झाला. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी आयपीएलमध्ये पदार्पण केले. गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात ते सहभागी होते. प्रवीण तांबे हे 41 वर्षांचे असताना त्यांनी राजस्थान रॉयल्समधून क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
