Share

गंभीर प्रश्नांकडे महाविकास आघाडीचे दुर्लक्ष, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा आरोप!

Published On: 

लालसगाव : केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले, असा जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमाशी बोलताना डॉ पवार म्हणाल्या, विजेच्या प्रश्न, एसटी संप, विद्यार्थ्यांच्या परीक्षेत घोळ यामुळे आता जनताच महाविकास आघाडी सरकारला नाकारेल.

त्यामुळे या संदर्भात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आमचा कोणताही सहभाग राहणार नाही, असे सांगितले. आणि हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनात भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाही असा इशाराही दिला आहे. तसेच प्रत्येक राज्यात भाजपने विकास कामांसाठी चालना देण्याचे काम केले आहे. या पुढेही यातील सातत्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, “पाच राज्यांच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमधील विजय दिन आमच्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा व ऐतिहासिक आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार ही राज्यातील नागरिकांनी पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या कामावर विश्वास दाखवला. मागील सात वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या विकास कामांचा हा विजय आहे असेही म्हणाल्या. कोरोना संकट काळात लस तयार केली व इतर देशांनाही पुरविली. चारही राज्यातील मुख्यमंत्र्यांची विकास कामे असल्यामुळे पुन्हा जनतेने हा निकाल देऊन स्पष्ट केल्याचे पवार यांनी मत व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!