Share

विराट करणार सचिनच्या विक्रमाची बरोबरी; माजी कोच म्हणाले “तो १० वर्ष…”

Published On: 

मुंबई: विराट कोहली विरुद्ध सचिन तेंडुलकर यांच्यात महान कोण? असा वाद भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये नेहमी सुरु असतो. आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध त्याच्या पिढीतील महान फलंदाज, तेंडुलकर आणि कोहली यांच्यात कोण श्रेष्ठ आहे, याचे उत्तर येणारा काळच सांगेल. मात्र सध्या कोहली तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या टॅलीशी बरोबरी करण्यापासून सहा एकदिवसीय शतके दूर आहे.

भारताचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (anshuman gaikwad) यांनी विराट कोहलीवर (virat kohli) प्रचंड विश्वास दाखवला. “१०० कसोटी सामने खेळणे आणि त्यात सातत्य राखणे ही एक मोठी कामगिरी आहे.१०० कसोटी सामने खेळून त्याने मिळवलेला अनुभव हा मोठा फरक आहे. जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे, तोपर्यंत त्याला कोणी हात लावू शकत नाही. त्याची तंदुरुस्तीबद्दल एवढी जागरुकता पाहता तो २०० कसोटी पर्यंत गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. ज्यात पद्धतीने तो खेळत आहे मला खात्री आहे की तो तंदुरुस्त असेल आणि पुढील १० वर्ष अजून खेळेल.”

अंशुमन गायकवाड यांनी विराटची प्रशंसा करत पुढे सांगितले “त्याची वृत्ती, त्याचे व्यक्तिमत्व, मैदानावरील त्याची कृती दर्शवते की तो हार मानणारा माणूस नाही आणि तो शेवटपर्यंत लढणारा माणूस आहे. हेच त्यांनी जगाला दाखवून दिले आहे. मागे फिरायचे नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्याला पराभव स्वीकारायचा नाही. त्याचे विचार खूप सकारात्मक आहेत, तो शेवटपर्यंत कधीही हार मानत नाही, त्याने परफॉर्म करून जगाला दाखवून दिलं की, फक्त भारतातच नाही तर बाहेरही सगळं शक्य आहे.” सचिन जेव्हा त्याच्या फलंदाजीच्या पराक्रमाच्या शिखरावर होता १९९८ मध्ये, तेव्हा गायकवाड भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!