Share

“बाबूश मोन्सेरात यांचे चरित्र व चारित्र्य पाहता…”, संजय राऊतांची टीका

Published On: 

मुंबई: गोव्यात शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन दाखवले होते. गोव्यातील सभाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या खांद्यावर सोपवली गेली होती. त्यात राऊत यांनी मोठे दावे केले होते. तर उत्पल पर्रीकर यांनी भाजपशी बंड करून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे गोव्याच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र निकाल विरोधी पक्षाला अनपेक्षित आला. आता यावरूनच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

गोव्यातील निकाल पाहता भाजपने जवळजवळ बहुमत गाठले आहे. चांगला जम असतानाही काँग्रेस १२ जागांवरच रखडून पडली. भाजपला २० पर्यंत मजल मारता आली. पणजीत उत्पल पर्रीकर हे पराभूत झाले. बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांचे चरित्र व चारित्र्य पाहता पणजीची जनता बाबूश महोदयांना कायमचे घरी पाठवील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. गोव्यात आप , तृणमूल काँग्रेसने पसारा मांडला, त्याचा फायदा शेवटी भारतीय जनता पक्षालाच झाला. अशी टीका संजय राऊत यांनी केली.

दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आता दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवतील. गोव्यात यावेळी केवळ भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली नाही तर, बहुरंगी लढत झाली. नव्या पक्षांच्या रुपात कथित सेक्युलर मतदारांसमोर यावेळी अनेक पर्याय समोर आले व परिणामी विरोधकांनी एकमेकांची मते मोठ्या प्रमाणात फोडली. याचा लाभ सत्ताधारी भाजपला झाला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!