🕒 1 min read
मुंबई: उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल विरोधी पक्षाला धक्का लावून गेला आहे. भाजपने बहुमत मिळवत ३०० च्या आसपास टप्पा गाठत आपली ताकत दाखवून दिली आहे. राम मंदिर, शेतकरी आंदोलन असे विविध मुद्दे असताना भाजपने सर्वाधिक जागा जिंकत विरोधी पक्षाला दम भरवला आहे. कॉंग्रेस आणि मायावतींचा बहुजन पक्ष यांना अतिशय निराशादायक निकाल लाभला आहे. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
“भाजपला मोठा विजय मिळाला आहे. यूपी त्यांचे राज्य होते पण अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या आहेत. भाजपच्या विजयात मायावती (Mayawati) आणि ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचे योगदान आहे. या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागणार आहेत. आम्ही आनंदी आहोत. विजय आणि पराभव आहेत. तुमच्या आनंदात आम्हीही आहोत.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान उत्तर प्रदेशातील निकालावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी व मित्रपरिवार १८० चा आकडा गाठेल असे चित्र शेवटपर्यंत होते. तसा प्रतिसाद त्यांना मिळत होता, पण यादवांना दीडशेचा टप्पा गाठता आला नाही. मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली. असेही राऊत यांनी सामना अग्रलेखात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
विराटने केली सचिनच्या विक्रमाची बरोबरी; माजी कोच म्हणाले “तो १० वर्ष…”
-
“बाबूश मोन्सेरात यांचे चरित्र व चारित्र्य पाहता…”, संजय राऊतांची टीका
-
“…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते”, संजय राऊतांनी व्यक्त केला संशय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
