Share

महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेत्याचे शिवसेनेवर गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. काल (मंगळवार) मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची वाॅर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. येथील रंगशारदा सभागृहात आरक्षित वाॅर्डांची लाॅटरी पद्धतीने निवड करण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना आपला वाॅर्ड गमवावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये अंतर्गत वाद वाढले आहेत.

दरम्यान यावरून आता राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडी मधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. नगर विकास खात्याच्या निर्देशावरून आता मुंबई वार्ड पुनर्रचनेत फेरफार केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी शिवसेनेवर केला आहे.

“महानगरपालिका प्रशासन मुद्दाम काँग्रेल मुंबईत कसा दाबायचे आहे. राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आखला आहे. मुंबई वार्ड रचना हे काँग्रेला घाबरवण्याठी केले आहे. काँग्रेसला जास्त जागा मिळायला नको म्हणून ही खेळी आखण्यात आली आहे. या रचनेत शिवसेनेने स्वत:च्या फायद्यासाठी फेरफार केली आहे”, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे.

महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे दिग्गज नेते यशवंत जाधव यांचा वाॅर्ड क्रमांक ११७ हा महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तसेच अमेय घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे या विद्यमान नगरसेवकांचे वाॅर्डही महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.

– मुंबई महानगरपालिका निवडणूक 2022 करता एकुण 236 वॉर्ड या पैकी ११८ महिलांसाठी आरक्षित

– १५ अनुसूचित जाती (८ महिलांसाठी) प्रभाग क्रमांक : ६०, ८५, १०७, ११९, १३९, १५३, १५७, १६२, १६५, १९०, १९४, २०४, २०८, २१५ आणि २२१ हे अनुसुचित जातीसाठी राखीव

– यापैकी महिलांसाठी राखीव असणारे प्रभाग : ८५, १०७, ११९, १६५, १९०, १९४, २०४ अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव

– २ अनुसूचित जमाती (१ महिलांसाठी) – प्रभाग क्रमांक ५५, १२४ राखीव, यापैकी १२४ अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव

– २१९ वॉर्ड खुले (109 महिलांसाठी)

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!