मुंबई : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मात्र आता ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा कार्यक्रम रद्द केला गेला, अशीही माहिती समोर येत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कार्यक्रम रद्द केल्याने नाराज झालेल्या विवेक अग्निहोत्री यांनी ऑक्सफर्डच्या विद्यार्थी संघटनेविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्विट केले आहे. व्हिडिओ शेअर करत ही घटना ‘हिंदुफोबिक’ असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की, ऑक्सफर्ड विद्यापीठात हिंदू विद्यार्थी अल्पसंख्यांक असून विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष पाकिस्तानी आहे.
माहितीनुसार विवेक अग्निहोत्री यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात भाषण देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. पण ऐनवेळी शेवटच्या क्षणी ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत की, “मला ईमेलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सगळं काही ठरलं होतं. पण काही तासांपूर्वी मला चुकून दोन बुकिंग झाल्या असून यामुळे कार्यक्रम होऊ शकत नाही, असं सांगण्यात आलं. मला न विचारता १ जुलै तारीख ठरवण्यात आली आहे. कारण त्या दिवशी कोणीही विद्यार्थी नसतील आणि कार्यक्रम करण्याला काही अर्थही नाही”.
“ते फक्त मलाच रद्द करत नाही आहेत तर ते लोकशाहीच्या प्रक्रियेतून निवडून आलेल्या भारत सरकारला आणि खासकरुन मोदींना रद्द करत आहेत. आमच्यावर इस्लामोफोबिक असल्याचा शिक्का मारला जात आहेत. ते नरसंहार रद्द करत आहेत आणि हिंदूंना रद्द करत आहेत. जणू काही हजारो काश्मिरी हिंदूंना मारणे हे हिंदुफोबिक नसून सत्यावर चित्रपट बनवणे म्हणजे इस्लामोफोबिक आहे,” असंही विवेक अग्निहोत्री म्हणाले आहेत.
IMPORTANT:
Yet another Hindu voice is curbed at HINDUPHOBIC @OxfordUnion.They have cancelled me. In reality, they cancelled Hindu Genocide & Hindu students who are a minority at Oxford Univ. The president elect is a Paksitani.
Pl share & support me in this most difficult fight. pic.twitter.com/4mGqwjNmoB— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 31, 2022
व्हिडीओत ते सांगत आहेत की, “मी सध्या युरोपमध्ये आहे. केंब्रिज विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, ब्रिटीश संसद, जर्मनी आणि नेदरलँडमधील अनेक प्रतिष्ठित ठिकाणांकडून मला निमंत्रित केल्यामुळे हा दौरा ठरवण्यात आला. पण काल एक विचित्र गोष्ट घडली. केंब्रिज विद्यापीठात पोहोचलो असता मला अखेरच्या क्षणी आम्ही कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकत नाही, असं सांगण्यात आलं. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर १०० टक्के घाला आहे. काही पाकिस्तानी आणि काश्मिरी मुस्लिम विद्यार्थ्यांनी याला विरोध केल्यामुळे हे घडले. हे नरसंहार नाकारणारे आहेत. मी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या भारत सरकारचं समर्थन करतो हा यामागील तर्क आहे”.
“हे तेच विद्यापीठ आहे जिथे सुभाषचंद्र बोस यांनी शिक्षण घेतलं होतं, पण अलीकडेच त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बोस यांना फॅसिस्ट म्हटले गेले,” असेही विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

